By  
on  

Birthday Special: बावनकशी अभिनयाचा जादूगार ‘नाना पाटेकर’

नाना पाटेकर....... बस नाम ही काफी है ! असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नाना केवळ अभिनेता म्हणून आपल्याला परिचित नाही. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचा हळवा, संवेदनशील चेहराही आपण सगळ्यांनी पाहिला आहे. रंगभूमी असो किंवा सिनेमा नानाने त्याचा अमीट ठसा उमटवला आहे. ‘गमन’ या सिनेमातून नानाने करीअरला सुरुवात केली. त्यानंतर अंकुश, परिघात, मोहरे या सिनेमातून तो समोर येत राहिला. पण सलाम बॉम्बेने त्याला प्रसिद्धी दिली. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nana patekar (@nana.patekar) on

 

हिंदी सिनेमासोबतच मराठीतही नानाच्या अभिनयाची ओळख बनत होती. त्यापैकी सिंहासन, भालू, माफीचा साक्षीदार या सिनेमांतील अभिनयाने त्याने दर्जेदार अभिनयाची झलक दाखवली. त्यानंतर आलेल्या ‘परिंदा’ने नानाला प्रस्थापित अभिनेत्यांच्या यादीत नेऊन बसवलं. या सिनेमासाठी नानाला सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nana patekar (@nana.patekar) on

 

त्यानंतर तिरंगा, क्रांतीवीर यामध्ये त्याने हटके अभिनयाचं दर्शन घडवलं. अग्निसाक्षीसाठी त्याला पुन्हा एकदा सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतरच्या खामोशी, गुलाम ए मुस्तफा, यशवंत, वजूद, कोहराम या सिनेमांनी त्याला विविधांगी भूमिका साकारण्याची संधी दिली. हिंदीसोबतच नाना मराठीतही दिसत होता. देऊळ, नटसम्राट, यशवंत राव चव्हाण: बखर एका वादळाची, डॉ. प्रकाश बाबा आमटे, आपला मानूस, पक पक पकाक या सिनेमांनी नानाचा मराठीतही खास चाहतावर्ग निर्माण केला. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nana patekar (@nana.patekar) on

 

नानाला त्याच्या वाढदिवसानिमित्त पीपिंगमून मराठीकडून वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा. त्याने पुढेही असच काम करत रसिकांना आनंद द्याव्यात या सदिच्छा....

Recommended

PeepingMoon Exclusive