By  
on  

Republic Day 2020: प्रजासत्ताक दिन साजरा करा या देशभक्तीपर वेबसिरीज पाहून

सिनेमा हे कथा सांगण्याचं उत्तम माध्यम आहे. त्याशिवाय आणखी एक नवं आणि प्रभावी माध्यम येऊ घातलं आहे ते म्हणजे वेबसिरीजचं. प्रभावी कंटेट, उत्तम कलाकार आणि नेमकी मांडणी यामुळे वेबसिरीजनी अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. कुंपणापलीकडच्या विषयांना हात घालताना काही देशभक्तीपर वेबसिरीजनीही स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. या प्रजासत्ताक दिनाला या वेबसिरीजचा आनंद जरूर घ्या. 

गोंद्या आला रे: 
इतिहासातील प्रसिद्ध रॅंड वधाची कथा वेबसिरीजमधून पाहताना अंगावर रोमांच आल्याशिवाय रहात नाही. दामोदर हरी चाफेकर आणि त्यांचे दोन्ही बंधू यांनी रॅंड येण्याचा इशारा म्हणून वापरलेला परवलीचा शब्द म्हणजे ‘गोंद्या आला रे’. ही वेबसिरीज एक वेगळीच उर्जा भरेल यात शंका नाही. 

हुतात्मा: 
संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाही. तर संपुर्ण देशावरही त्याचे पडसाद उमटले आहेत. या चळवळीच्या दैदिप्यमान इतिहासाची झलक या वेबसिरीजमधून पाहायला मिळते. 

 

द फरगॉटन आर्मी: आझादी के लिये: 
आझाद हिंद सेनेने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या चळवळीची प्रेरणादायी कथा या वेबसिरीजमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. या वेबसिरीजमधून आझाद हिंद सेनेच्या जिद्दीची शौर्याची कथा तुम्हाला प्रेरणा देईल यात शंका नाही. 

 

द टेस्ट केस: 
प्रत्यक्ष रणभूमीवर उतरलेल्या पहिल्या महिला सैनिकाभोवती ही कथा फिरते. निमरत कौरच्या सशक्त अभिनयाने या सिरीजला चारचांद लागले आहेत. सैनिकांचं प्रत्यक्ष रणभूमीवर आयुष्य, समोर येणारी आव्हानं या वेबसिरीजमधून समोर येतात.  

बोस: डेड और अलाईव्ह: 
भारतीय इतिहासातील अनेक रहस्यांपैकी एक म्हणजे कॅ.सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू. इतिहासातील हे पान वेबसिरीजच्या निमित्ताने पुन्हा उघडलं गेलं आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive