By  
on  

बहिण-भावाच्या नात्यांवर आधारित असलेले हे मराठी सिनेमे यंदा 'रक्षाबंधना'निमित्त एन्जॉय करा !

बहिण-भावंच नातंच खास असतं, कधी खोडकर तर कधी प्रेमळ मदतीला  धावून येणारं. तुम्हा-आम्हा सर्वांनाच याचा अनुभव आहे.भाऊ-बहिण ज्यावरून भांडू शकत नाहीत असा एकही विषय या जगात नसेल पण एकमेकांसाठी जीव  ओवाळून टाकणारी आाणि प्रसंगी  एकमेकांसाठी आई-वडिलांचा मार खाणारीसुध्दा हीच भावंड असतात. 

मराठी सिनेमातही असे भाऊ- बहिणीच्या बंधावर आधारलेले नवे -जुने सिनेमे आहेत. त्यातील निवडक सिनेमे आज तुम्ही 'रक्षाबंधनानिमित्त'  नक्की पाहा आणि घरच्याघरी  सेलिब्रेशन  एन्जॉय करा. 

हॅपी जर्नी: 

या भाऊ-बहिणीची जगावेगळी स्टोरी प्रत्येकालाच भावली. या सिनेमाला आजच्या जनरेशनचा टच होता तसेच भावनिक किनारही होती. त्यामुळे प्रत्येक वयोगटाला हा सिनेमा हवाहवासा वाटतो. अभिनेता अतुल कुलकर्णी व अभिनेत्री प्रिया बापट या जोडीच्या भाऊ-बहिणीची गोष्ट तुम्हाला आपल्याच घरातील वाटेल. 

 

एलिझाबेथ एकादशी: 

भाऊ-बहिण एकमेकांचे क्राईम पार्टनरही असतात. एलिझाबेथ एकादशी  मुक्ता आणि ज्ञानेश या भावंडांची जोडीही त्यामुळेच हटके ठरते. हुशार आणि चुणचुणीत असलेली जोडी तुम्हालाही तुमच्या लहानपणाची आठवण करून देईल यात शंका नाही. 

खारी बिस्कीट: 

अंध बहिण आणि तिला जीवापाड जपणा-या भावाची ही गोष्ट प्रत्येकालाच हळवं करणारी आहे. खारीसाठी बिस्कीट आणि बिस्कीटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण.  बहिण भावाच्या या आगळ्या जोड-गोळीची ही गोष्ट प्रेक्षकांना खुप भावते. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive