By  
on  

लॉकडाऊनमधील स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करा हे मराठी सिनेमे पाहून

आज देशभरात 74 व्या स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष आहे. सगळीकडे करोनामय वातावरण असल्याने नेहमीच्या सेलिबब्रेशनचा विरस झाला असला तरी उत्साह मात्र कायम आहे. आहे. करोनामुळे आपल्यापैकी प्रत्येकजण घरी बसला आहे. देशभक्तीचा इतिहास उलगडणा-या मराठी सिनेमांनी प्रेक्षकांना स्वातंत्र्य कोणत्या अथक प्रयत्नांतून मिळालंय, हे पटवून दिलं आहे. रुपेरी पडद्यावर स्वातंत्र्याचा हा रोमहर्षक इतिहास मांडणारे सिनेमे पाहून, आपल्या सर्वांचाच ऊर अभिमानाने भरुन येतोय, म्हणूनच पिपींगमून डॉट कॉमवर खास जाज्वल्य देशाभिमान जागवणा-या मराठी सिनेमांबद्दल जाणून घ्या.

लोकमान्य एक युगपुरुष:

=
भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील हा सिनेमा जरूर पाहायला हवा. लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढय़ातील योगदान आणि त्यांच्या लहानपणातल्या गोष्टी यापलिकडे जाण्याचा कौतुकास्पद प्रयत्न ओम राऊतने केला आहे. अभिनेता सुबोध भावे हा टिळकांची भूमिका पडद्यावर मांडण्यात यशस्वी ठरला आहे.

 

नीळकंठ मास्तर :


स्वातंत्र्यलढय़ात सहभागी झालेल्या छोटय़ा गटांतील माणसांचे वैयक्तिक आयुष्य, मोठी कामगिरी बजावण्याचे त्यांचे स्वप्न आणि वैयक्तिक आयुष्यातील प्रिय व्यक्ती, प्रेम यामुळे निर्माण झालेले द्वंद्व यावर बेतलेला सिनेमा म्हणजे निळकंठ मास्तर नेहा महाजन, ओंकार गोवर्धन आणि पुजा सावंत यांच्या अभिनयाने हा सिनेमा सजला आहे. 

वीर सावरकर : 


स्वातंत्र्यवीर अशी पदवी मिळालेले स्वातंत्र्यसेनानीवर बेतलेला सिनेमा म्हणजे वीर सावरकर. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या थोर क्रांतीकारकाला जुलमी ब्रिटीश सरकारने त्यांना जन्मठेपेची-काळ्या पाण्याची-शिक्षा सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात ठोठावण्यात आली. या सिनेमात त्यांचा दैदिप्यमान लढा दिसून येतो. अभिनेता शैलेंद्र गौड यांनी सावरकरांची व्यक्तिरेखा साकारली.

 वासूदेव बळवंत फडके: 


आद्य क्रांतिकारी म्हणून ज्यांचा सन्मान केला जातो असे वासूदेव बळवंत फडके यांच्यावर हा सिनेमा बेतला आहे.  गजेंद्र अहिरे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटीशांविरूध्द पहिला सशस्त्र लढा उभारला होता. या सिनेमात चतुरस्त्र अभिनेता अजिंक्य देव याने या व्यक्तिरेखाला पुरेपूर न्याय दिला.

Recommended

PeepingMoon Exclusive