By  
on  

Birthday Special: महागुरु सचिन पिळगावकरांचे हे टॉप 5 सिनेमे देतात पुरेपूर मनोरंजनाची गॅरण्टी

मराठी सिनेसृष्टीसह हिंदीतही मोलाचं योगदान देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे सचिन पिळगांवकर. अभिनय, दिग्दर्शन, नृत्य  आणि गायन अशा सर्वच क्षेत्रातील ते महागुरू आहेत. आज 17 ऑगस्ट हा सचिनजींचा वाढदिवस. आपल्या कारकिर्दीची सुरूवात त्यांनी बालकलाकार म्हणून केली. ‘हा माझा मार्ग एकला’ या सिनेमातील बालकलाकाराच्या भूमिकेतील सचिनजींना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. मराठीसोबतच हिंदीतसुध्दा सचिनजींनी आपल्या अभिनयाचा झेंडा रोवला आहे. ‘नदियॉं के पार’, ‘अखियो कें झरोके सें’ या सिनेमांमधील त्यांनी रंगवलेला नायकाचे प्रचंड कौतुक झाले.

मराठी सिनेमांमधील त्यांच्या सुपरहिट सिनेमांची यादी न संपणारी आहे. पत्नी आणि चतुरस्त्र अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांच्या साथीने ते नेहमीच दर्जेदार सिनेमांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

सचिनजींचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका असलेला माझा पती करोडपती धम्माल विनोदी सिनेमा आहे. सुप्रिया पिळगावकर यांनीसुध्दा जबरदस्त साथ देत तुझी माझी जोडी जमली म्हणून ठेका धरला.  

 दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका असलेला सचिन पिळगांवकर यांचा नवरी मिळे नव-याला आणखी एक सिनेमा. अशोक, सराफ, निवेदिता सराफ, आशालता आणि सुप्रिया पिळगांवकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा विनोदी सिनेमा जबरदस्त सुपरहिट ठरला. ही नवरी असली...या गाण्याने तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. सचिनजींनी या सिनेमात साकारलेला साधा- सरळ जयराम आजही मनात घर करुन आहे व अलबेला..आला जयराम आला या गाण्यावर तर ते आजही जबरदस्त ताल धरतात.

 

ह्या सिनेमाने सिनेसृष्टीत इतिहास घडवला. अशी ही बनवाबनवी या अफलातून सुपरहिट ठरलेल्या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्याबरोबरच अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, अश्वीनी भावे, प्रिया अरूण, सुप्रिया या कलाकारांच्या फौजेत सामील होत, सचिनजींनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारली. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमात त्यांनी साकारलेल्या स्त्री भूमिकेचं कौतुक करावं तितंक कमी आहे. हा धम्माल विनोदी सिनेमा आजही मराठी प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतो, हे विशेष.

 

घरात समृध्दी यावी म्हणून विनावस्त्र अष्टविनायकाला जाऊन नवस फेडण्यासाठी केलेला खटाटोप आणि या प्रवासदरम्यान भेटलेले अतरंगी प्रवासी  यांची धम्माल गोष्ट सचिन-सुप्रिया यांच्या नवरा माझा नवसाचा या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आली. खळकळून हसवणा-या या सिनेमाने रसिकांचे भरभरून मनोरंजन केले.

 

अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शित कट्यार काळजात घुसली या सिनेमातील सचिनजींनी साकारलेल्या खॉं साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीला सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आणि त्यांच्या अभिनयाचा एक वेगळा पैलू सर्वांसमोर आला. खलनायक म्हणून त्यांच्या या व्यक्तिरेखेकडे पाहिले जाते. त्यांनी या भूमिकेला अगदी तंतोतंत न्याय देत प्रेक्षकांना नवीन काहीतरी देण्याचा अप्रतिम प्रयत्न केला.  

 

 पिपींगमून मराठीतर्फे सचिनजींना मानाचा मुजरा

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive