By  
on  

गणेशोत्सव 2020: गणेशभक्तीचा महिमा सांगणारे हे सिनेमे जरूर पाहा

करोनाचं सावट काही अंशी दूर सारून का होईना गणपती उत्सवाने चराचरात चैतन्य भरलं आहे. वर्षातून एकदा गणपती बाप्पा घरी येणार म्ह्टल्यावर स्वागतासाठी अनेक पद्धतीने तयारी करत असतो. पण यंदाचा उत्सव मात्र काहीसा हटके आहे. यंदाच्या उत्सवात घरी राहूनच बाप्पाच्या आगमनाचा सोहळा साजरा करायचा आहे. घराचा माहोल बाप्पामय करण्यासाठी हे मराठी सिनेमे जरूर पाहा.

आप्पा आणि बाप्पा: 
एक सामान्य मराठी माणूस गणेशोत्सवामध्ये आर्थिक बाबींमध्ये भरडला जातो. मोठ्या उत्सवापायी त्याला आर्थिक चणचण सहन करावी लागते. अशा वेळी खुद्द बाप्पाच त्याच्या भेटीला आल्यावर काय काय धमाल उडते ही या सिनेमामधून दिसणार आहे. या सिनेमात सुबोध भावे आणि भरत जाधव यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. 

धप्पा: 
लॉकडाऊन पुर्वीच्या गणोशोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. पण या प्रकारांना हटके वळण मिळतं त्यावेळी     मोठ्यांना लहान मुलं कशाप्रकारे जाणीव करून देतात हे या सिनेमात पाहायला मिळतं. गणेशोत्सवाचा प्रचलित अर्थ जणू या सिनेमाने पुन्हा एकदा उलगडून सांगितला आहे. 

 

मोरया: 
गणेशोत्सवात लक्षवेधी ठरते ती मंडळातील गणपतीची आरास. मंडळातील गणपतीचा थाट वेगळाच शिवाय घरातील गणपतीच्या कौतुकाची प्रत्येकाची पद्धत न्यारी. पण गणपती मंडळाच्या स्पर्धेसोबतच राजकारणालाही हटके रंग चढत जातो. पण या सगळ्याच्या मुळाशी असलेली गणपती बाप्पाबद्दलची भावना मात्र तशीच राहते.   

अष्टविनायक: 
गणेशोत्सवात पाहिला जाणारा ऑलटाईम फेव्हरिट सिनेमा म्हणजे अष्ट विनायक. सचिन आणि वंदना पंडित यांची केमिस्ट्री असलेला हा सिनेमा यातील सुश्राव्य गाण्यांमुळे चांगलाच प्रसिद्धीस आला. या सिनेमाने प्रत्येकाच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. 

लोकमान्य: एक युगपुरुष: 
गणेशोत्सव आपण सगळे जल्लोषात साजरा करतो. पण या उत्सवाचा शुभारंभ करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेच याशिवाय तो उत्सव सुरुही केला अशा लोकमान्य टिळकांचा हा सिनेमा जरूर पाहायला हवा. यातील गजानना गजनाना या गाण्याने तुमच्यात जोश संचारेल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive