By  
on  

Video : मराठी सिनेमांतील ही बाप्पाची गाणी द्विगुणीत करतात गणेशोत्सवाचा आनंद

यंदा करोना संकटामुळे बाप्पाचं आगमन जल्लोषात करण्यात जरी परवानगी नसली तरी घरोघरी बाप्पाचं त्याच उत्साहात आज स्वागत होत आहे. विघ्नहर्त्याकडे प्रत्येकजण जगावर दाटलेले हे काळे ढग लवकर दूर होवोत अशी मनोभावे प्रार्थना करतायत. 

गणेशोत्सव आणि  गाणी यांचं एक अतूट नातं आहे. गाणी बाप्पाच्या हा उत्साह द्विगुणित करतात. गणेशोत्सवाच्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये,सार्वजनिक मंडळात मराठी सिनेमातील बाप्पाची ही गाणी जेव्हा वाजतात तेव्हा प्रत्येकात एक वेगळाच उत्साह संचारतो. 
 

चला तर पाहूया गणेशोत्सवातील बाप्पाची ही लोकप्रिय गाणी 

 

 

मोरया मोरया (उलाढाल ) 
उलाढाल या मल्टिस्टारर सिनेमातलं देवा दिली हाक....मोरया मोरया हे गाणं तुफान लोकप्रिय आहे. २००८ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अजय-अतुलच्या संगीताने सजलेलं हे गाणं गणेशोत्सवात प्रत्येकाच्या घरी आवर्जुन वाजवलं जातं. इतकंच नाही तर कुठलीही मोठ्या मानाच्या गणपतींची सार्वजनिक मिरवणूक या गाण्याशिवाय अपूर्णच आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यावर हे संपूर्ण गाणं चित्रित करण्यात आलं. 

मोरया ( मोरया )
मोरया हा २०११ साली प्रदर्शित झालेला सिनेमा आहे. गणेशोत्सवातील राजकारणावर बेतलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन संगीतकार –गायक अवधूत गुप्ते यांनी केलं आहे. मोरया या सिनेमातील मोरया हेच शिर्षकगीत आहे. तूच माझी आई देवा...तूच माजा बाप या शब्दांनी सुरुवात होणारं हे भावूक गाणं सिनेमाचे अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि संतोष जुवेकर यांच्यावर चित्रित झालं आहे. 

गजानना (लोकमान्य -एक युगपुरुष ) 
सर्वांनी एकत्र येऊन मिळून-मिसळून सण साजरे करावेत म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे लोकमान्य टिळक यांच्या जीवनाव आधारीत लोकमान्य -एक युगपुरुष या सिनेमातील गजानना गजानना...ही बाप्पाची आरती प्रचंड लोकप्रिय आहे. घरोघरी ही आरती वार्जून ऐकायला मिळते. ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमातील गाणं लोकमान्यांची भूमिका साकारणारा अष्टपैलू अभिनेता सुबोध भावेवर चित्रित करण्यात आलं आहे. 

मोरया (दगडी चाळ ) 
मोरया मोरया हे गीत दगडी चाळ या सिनेमातले असून या गीताचे गायक आदर्श शिंदे हे आहेत. ह्या गीतचे संगीत दिग्दर्शक अमित राज यांनी केलं असून अभिनेता अंकुश चौधरीवर ते चित्रित करण्यात आलं आहे. 2005 सी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 

या रे या सारे या गजाननाला आळूया ( व्हेंटीलेटर)
बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पहिला-वहिला सिनेमा व्हेंटीलेटर सिनेमातील या रे या सारे या गजाननाला आळूया....ही आरती खुपच लोकप्रिय झाली. या मल्टिस्टारर सिनेमात प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांनी प्रमुख भूमिका साकारली होती. 

सूर निरागस होवो ( कट्यार काळजात घुसली)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive