‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधला तो सीन झाला होता व्हायरल, प्रिया बापटची होती ही प्रतिक्रीया

By  
on  

 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरीज मधला प्रिया बापटचा तो सीन आठवतोय का...हो तोच लेस्बियन किसिंग सीन , जो व्हायरल झाला होता. या गरमागरम सीनची प्रचंड चर्चा प्रेक्षक आणि माध्यमांमध्ये रंगली होती. नागेश कुकनूर दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री गीतिका त्यागीसोबतचा प्रियाचा हा बोल्ड सीन पाहून तिला नेटक-यांनी खुप  ट्रोलही केलं. प्रिया बापटला सर्वच स्तरांमधून बऱ्या-वाईट प्रतिक्रियांचा सामना करावा लागला होता. 

याबाबतच पिपिंगमून मराठीशी बोलताना प्रिया बापट म्हणाली होती,''एका मिनिटांच्या छोट्या क्लीपमधून लोक चारित्र्यावर डाग ठेवतात जे चुकीचं आहे. तुम्ही संपूर्ण सिरीज पाहिल्यावर त्या दृश्याची काय गरज आहे, ते दृश्य किती महत्वाचं आहे हे तुम्हाला कळेल. हे दृश्य कामाचा एक भाग आहे, या दृष्टीकोनामधून त्याकडे बघितलं पाहिजे.पण यावर आपण न बोलून आपलं काम करत राहणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. मी आजपर्यंत तेच केलंय. माझं काम बोलू दे. प्रेक्षकांनी वेब सीरिज पाहिली तर त्या दृश्याचं महत्त्व, ते दृश्य का आहे हे समजेल''

याबाबत बोलताना प्रिया बापटने पुढे स्पष्ट केलं होतं,''कलाकारांचं जे काम असतं ते काम करून कलाकार घरी जातो. त्यावरून त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासारखं काही नसतं. सगळ्यात महत्वाचा भाग आपण काम कोणासोबत करतोय, प्रोजेक्ट काय आहे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे मी काही गैर किंवा आक्षेपार्ह्य केलय असं मला अजिबात वाटत नाही. ज्यांना हे घ्रृणास्पद वाटत आहे त्यांनी जरा संकुचित वृत्ती बाजूला ठेवून समाजाकडे बघावं. दुसऱ्यांच्या मताचा आदर करणं त्यांनी शिकलं पाहिजे.''

प्रिया बापटने या वेबसिरीजमध्ये पूर्णिमा गायकवाड ही व्यक्तिरेखा साकारली. एक महत्वाकांक्षी, आत्मविश्वासू अशी ही व्यक्तिरेखा या सिरीजमध्ये पाहायला मिळाली. हे धाडसी पात्र साकारल्याबद्दल प्रिया बापटवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव तर केलाच याशिवाय ही वेबसिरीजही प्रचंड गाजली होती. अभिनेता सिध्दार्धल चांदेकर आणि अतुल कुलकर्णी यांच्याही या सिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 

Recommended

Loading...
Share