अभिनेत्री नेहा पेंडसेच्या या घायाळ करणाऱ्या अदाकारीवर तुम्ही फिदा व्हाल

नेहा पेंडसेने हिंदी आणि मराठी सिनेमा आणि मालिका विश्वात स्वतःची एक वेगळी निर्माण केली आहे. 'मराठी बिग बॉस २' मध्ये सुद्धा नेहा दिसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसेने हिंदी आणि मराठी सिनेमा आणि मालिका विश्वात स्वतःची एक वेगळी निर्माण केली आहे. १९९९ साली आलेल्या ‘प्यार कोई खेल नही’ या हिंदी सिनेमातून तीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे तीने एकता कपूरच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची निर्मिती असलेल्या ‘कॅप्टन हाऊस’ या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केलं. झी मराठीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेमुळे तीला खरी ओळख मिळाली. नेहाने अनेक हिंदी, मराठी आणि मल्याळम सिनेमात काम केले आहे. अलीकडेच नेहा ‘हिंदी बिग बॉस’च्या नवीन पर्वात दिसली होती. लवकरच येणाऱ्या ‘मराठी बिग बॉस २’ मध्ये सुद्धा नेहा दिसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of