शॉर्ट ड्रेसमध्ये खुलला श्वेता शिंदेचा स्टायलिश अंदाज

By  
on  

श्वेता शिंदे आजवर अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती अशा अनेक भूमिकांमधून आपल्याला भेटली आहे. छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या मालिकांमधून तिने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. विशेष करुन ती साकारत असलेल्या नकारात्मक भूमिकांचं प्रचंड कोतुक झालं. सध्या ती डॉक्टर डॉन या मालिकेत डीनच्या भूमिकेत दिसत आहे.  

 

श्वेता सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकद ती हटके लूकमधील फोटोही शेअर करत असते. आताही तिने ब्लू शॉर्ट वनपीसमधील फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने क्युट शुजही कॅरी केले आहेत. एरवी साडीत दिसणारी ही डार्लिंग डीन या लूकमध्येही खास दिसते आहे.

Recommended

Loading...
Share