आपल्या गोड लूक्सने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे रश्मी अनपट. रश्मीचा आज वाढदिवस आहे. ‘फ्रेशर्स’ मालिकेतील मनवा राजेची भूमिका साकारलेली रश्मी अनपट तुम्हाला आठवत असेल. लोभस चेहरा लाभलेली रश्मी पुढचं पाऊल, सुवासिनी या मालिकांमध्येही झळकली होती.
याशिवाय ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतील तिने साकारलेली ईश्वरीही आजही रसिकांच्या लक्षात आहे. रश्मी आता आई माझी काळूबाई या मालिकेत दिसते आहे. या मालिकेत तिने साकारलेली आर्याही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.