जगभरात आज Mothers day मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आहे. जगातील आपल्या सगळ्यात जवळचं, हक्काचं स्थान म्हणजे आई. त्यामुळेच स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हणतात ते उगीच नाही. जन्मापासून ते आपल्याला घडवण्यापर्यंत खरं तर संपूर्ण आयुष्यभर आईच आपली गुरु असते. मराठी सेलिब्रिटींनी आईसोबतचे खास फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.