By  
on  

अभिनेत्री कृतिका गायकवाडने योगदिनानिमित्त, मुंबईच्या रस्त्यांवर साधला ‘योग’

योग ही भारतातील ५००० वष्रे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे.

 

आज जगभरात २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होतोय. याच पार्श्ववभूमीवर मराठी अभिनेत्री कृतिका गायकवाड हिने मुंबई च्या ऐतिहासिक स्थळांवर तिचे सुंदर फोटोशूट केले. या फोटोशूट मध्ये अभिनेत्री कृतिका गायकवाड हीने ऊर्ध्व धनुरासन ,अंजनेयासन , वृक्षासन  , उभया पादांगुष्ठसन ,प्रसारित पादोत्तासन , वीरभद्रासन , बद्धकोनासन, उष्ट्रासन,  सेतुबंधासन , कटिचक्रासन , अर्धहलासन , हस्तपादासन , मत्स्यासन , पश्चिमोत्तासन , अर्धचक्रासन आणि अजूनही अनेक वेगवेगळी  आसने केली. या आसनांसाठी तिने मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांची निवड केली. मुंबईच्या एशियाटिक लायब्ररी आणि सीएसटी स्टेशन समोरील सेल्फी पॉईंट ह्या गजबजलेल्या ठिकाणी तिने हे फोटोशूट केले . कोरोना काळात सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी या उद्देशाने तिने हे फोटोशूट केले . 

 

याबद्दल कृतिकाला विचारले असता तिने सांगितले की , “मी नेहमीच २१ जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिन काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करते . मागील वर्षी मला काहीच करता आले नाही मात्र त्या अगोदर २०१९ मध्ये मी समुद्र किनाऱ्यावर फोटोशूट केले होते .२०१८ साली मी  आरे कॉलनी च्या निसर्ग रम्य पार्श्वभूमीवर फोटोशूट केले होते. “

 

अभिनेत्री कृतिका गायकवाड हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ह्याचे फोटोस आणि व्हिडीओ शेअर केले आहेत . अभिनेत्री कृतिका गायकवाड हीने  विठ्ठला शप्पथ , नेबर्स हे चित्रपट केले असून छोट्या पडद्यावर सुद्धा युवा डान्सिंग क्वीन हा मराठी कार्यक्रम आणि माय के सी बंधी डोर , शुभविवाह या हिंदी कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive