उत्तम अभिनेत्रीसोबत कुशल नृत्यांगना असलेली भार्गवी चिरमुले

By  
on  

 मराठी नाटक, सिनेमा, तसेच मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमधून छाप पडणारी गुणी अभिनेत्री म्हणजे भार्गवी चिरमुले. 'वहिनीसाहेब' मालिकेतून भार्गवी चिरमुले हे नाव घराघरात लोकप्रिय झालं. 

 

रुपारेल महाविद्यालयामधून भार्गवीने स्वतःचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. उत्तम अभिनेत्रीसोबत भार्गवी एक कुशल नृत्यांगनासुद्धा आहे. भार्गवीने 'भरतनाट्यमचं' प्रशिक्षण घेतलं आहे.

 

भार्गवीने 'एकापेक्षा एक' या डान्स रिऍलिटी शोचं विजेतेपद पटकावलं होतं. भार्गवीने अनेक मालिका, सिनेमे तसेच नाटकांमध्ये काम केले आहे. 

'विश्वविनायक', 'वन रुम किचन', 'धागेदोरे', 'संदूक', 'आयडियाची कल्पना', 'इश्क वाला लव्ह' यांसारख्या सिनेमांमध्ये भार्गवी झळकली होती. 

 

'वाहिनीसाहेब', 'असंभव', 'पिंजरा', 'अनुबंध', 'प्रपंच' यांसारख्या मालिकांमधून भार्गवीने प्रेक्षकांची मनं जिंकली. 

'झोपी गेलेला जागा झाला' या नाटकामधून भार्गवीने स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Shubha dipawali #marathitaraka #actorslife #happiness #happyfaces

A post shared by Bhargavi Chirmuley (@bhargavi_chirmuley) on

अलीकडेच भार्गवी 'संभाजी' या मालिकेत झळकली होती. भार्गवी सध्या 'आमच्या 'ही'चं प्रकरण' या विनोदी नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Just can't get over....Australia #ahpnatak #actorslife #happyfaces #happiness #travellovers #traveldairies #australia

A post shared by Bhargavi Chirmuley (@bhargavi_chirmuley) on

Recommended

Loading...
Share