By  
on  

Diwali Special: या अभिनेत्रींच्या लूकची प्रेरणा घेऊन तुमची दिवाळी बनवू शकता आणखी सुंदर

वर्षभरातील सणांचा राजा म्हणून दिवाळीकडे पाहिलं जातं. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस सगळीकडे उत्सवी वातावरण असतं. सध्या दिवाळी साजरी करण्याचा संदर्भ सगळीकडे बदलताना दिसत आहे. पण दिवाळीच्या काही प्रथा आजही अगदी नित्यनेमाने पाळल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे नवीन कपड्यांची. दिवाळीच्या वेळी पारंपरिक पण  स्टायलिश लूकमध्ये नटायला प्रत्येकालाच आवडतं. मग एरवी झगमगाटात वावरणारे सेलिब्रिटीही यात कसे मागे राहतील. मराठी अभिनेत्रींनीही यावेळी दिवाळीमध्ये लूक सोबत अनेक एक्सपेरिमेंट्स केले आहेत. हे स्टायलिश लूक तुम्ही फॉलो करून ‘स्टाईल दिवा’ बनू शकता. पाहा कोण कोण आहेत या अभिनेत्री.....  
तेजश्री प्रधान: 
खणाचा ब्लाऊज त्यावर हटके स्टाईलने ड्रेप केलेली साडी आणि या सगळ्यांवर कडी करणारा इंडो वेस्टर्न स्टाईलचा बेल्ट हा लूक हटके आणि क्लासी दिसतो यात शंका नाही. 

 

ऋतुजा बागवे: 
कोण म्हणतं काष्टा नेसणं आऊटडेटेड झालंय. सणासुदीचा गेट अप या लूक शिवाय अपुरा आहे. 

 

रुपल नंद: 
प्लेन साडी आणि त्यावर खणाचं ब्लाऊज ही स्टाईलदेखील सध्या इन आहे. यावर ऑक्साईडचे दागिने चार चांद लावतात.

 

 
मिथिला पालकर: 
तुम्हाला साडीऐवजी काही हटके ट्राय करायच असेल तर मिथिलाने कॅरी केली आहे तशी लेहेंगा चोली देखील ट्रेंडी आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Who's going to celebrated "No Pollution" Diwali?? Pic credits: @devanshi.15 #mithilapalkar #mithilapalkarfc

A post shared by Mithila Palkar (@mithilapalkarfc) on

 

रश्मी अनपट: 
साऊथ इंडियन स्टाईलचा मेक अप तुम्हाला खास लूक देऊ शकतो. 

 

 

तेजस्विनी पंडित: 
नेहमीच्या स्टायलिंग पेक्षा हटके काही ट्राय करायचं असेल तर प्लेन कुर्ता त्यावर हेवी वर्क जॅकेट हा उत्तम पर्याय आहे. सोबत हेवी झुमके मस्ट. 

 

सई ताम्हणकर: 
पिवळ्या रंगाची साडी आणि त्याला कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा ब्लाऊज आणि साडीला मॅचिंग ज्वेलरी असा सईचा लूक प्रत्येकालाच प्रेमात पाडेल यात शंका नाही.

 

अभिज्ञा भावे: 
फ्लोरल साडी, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज गळ्यात चोकर आणि मेस्सी बन. अभिज्ञाचा हा लूक ईजी कॅरी करता येण्यासारखा आहे. 

 

नेहा पेंडसे: 
जरी वर्क असलेला हेवी गाऊन, त्यावर बनारसी दुपट्टा आणि झुमके. नेहाचा हा गेट अप परफेक्ट फेस्टीव्ह लूक देतो.     

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Pendse (@neha.pendse) on

 

प्राजक्ता गायकवाड: 
सध्या टेंपल ज्वेलरीचा ट्रेंड सुरु आहे. सिल्क साडीसोबत टेंपल ज्वेलरी खास लूक देतो यात शंका नाही. 

 

 

अमृता खानविलकर: 
ज्वेलरीमध्ये पर्याय शोधत असाल तर ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी हा सर्वोत्तम पर्याय आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#navratri2019 Saree @mintnoranges Jewellery #mine #nofilter

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

प्रार्थना बेहरे: 
खणाचं फॅब्रिक सध्या इन आहे. त्यामुळे साडी-चोळी खणामध्ये ट्राय करु शकता. 

 

सोनाली कुलकर्णी: 
काहीही नवीन एक्सपेरिमेंट न करता हा टिपीकल ट्रॅडिशनल लूकही तुमच्या सौंदर्याला चार चांद लावू शकतो.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive