By  
on  

पाहा Photos:आर्चीच्या या नव्या लुकवर चाहते पुन्हा फिदा

आपल्या  बिनधास्त बेधडक अंदाजामुळे सैराट या सिनेमामुळे तमाम मराठी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रिंकु राजगुरु म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची. आर्ची सोशल मिडीयावर अनेक फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना खुश करते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करतात, 

नुकतंच दिवाळीत आर्चीने मराठमोळा साज लेवून एक फोटो पोस्ट केला होता. महत्त्वाचं म्हणजे या फोटोत तिच्यासोबत तिचा संपूर्ण परिवारसुध्दा होता. पुन्हा एकदा रिंकुने तिचा एक सालस व सोज्वळ फोटो पोस्ट केला आणि नेहमीप्रमाणेच चाहते त्यावर फिदा झाले आहेत.  साडी,मोकळे केस आणि नथ व हलकासा मेकअप अशा लुकमध्ये रिंकु नेटक-यांचं  लक्ष वेधून घेतेय. तर साडीतील तिचा फोटो पाहून तिने बरंच ट्रान्स्फॉर्मेशन केल्याचं लक्षात येतं.

'सैराट'नंतर रिंकु ब-याच कालावधीने 'कागर' या सिनेमाद्वारे रसिकांच्या भेटीला आली. आता तिच्या आगामी सिनेमाची बरीच चर्चा रंगलीआहे. तिने आगामी मेकअप या सिनेमासाठी सर्वात बक्कळ मानधन घेतल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive