By  
on  

क्रांती रेडकर अभिनयाव्यतिरिक्त या क्षेत्रातही आहे पारंगत

'कोंबडी पळाली' हे सुपरहिट गाणं ऐकलं की आजही डोळ्यासमोर येते ती अभिनेत्री क्रांती रेडकर. अनेक मराठी सिनेमांमधून रसिकांच्या समोर आलेली ही अभिनेत्री लग्नानंतर जणू सिनेमांमधून गायबच झाली. 
क्रांतीने २९ मार्च २०१७ ला समीर वानखेडे यांच्याशी लग्नगाठ बांधली.

 

 

समीर आयपीएस अधिकारी आहेत. क्रांतीने अलीकडेच जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. लग्नानंतर क्रांती सिनेमात दिसली नसली तरी आणखी एका क्षेत्रातील करीअरची सुरुवात तिने केली आहे. अलीकडेच तिने स्वत:च्या फॅशन ब्रॅण्डचं उद्घाटन केलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

All set for #padwa . Waiting for hubby dear..

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar) on

 

 

'झिया झायदा' नावाचा फॅशन ब्रॅण्ड तिने सुरु केला आहे. या नावाशी तिचं खास कनेक्शन देखील आहे. झिया झायदा हे तिच्या दोन्ही मुलींचं नाव आहे. याशिवाय क्रांती अनेकदा डबिंगही करते. 
ती उत्तम मिमिक्री करत असल्याने अनेकदा ती तिच्या आवाजाची जादूही करत असते.

 

 

तिने 'किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी' या सिनेमात एक गाणंही म्हटलं आहे. याशिवाय तिने काकण सिनेमाचं दिग्दर्शनही केलं आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive