By  
on  

गौरी नलवडेचे हे लूक तुम्हाला कसे वाटले?

मालिका ते सिनेमा असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे गौरी नलवडे. अभिनय कौशल्याच्या जोरावर गौरीने टेलिव्हिजन ते मोठा पडदा हे अंतर सहज पार केलं. गौरीने करीअरची सुरुवात ‘अवघाची हा संसार’ या मालिकेपासून केली. पण तिला ओळख मिळाली ती ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेतील वैदेहीच्या व्यक्तिरेखेमुळे.

 

 

त्यानंतर ‘फ्रेंड्स’ या सिनेमात गौरी सचित पाटील आणि स्वप्नील जोशीसोबत झळकली. त्यानंतर ‘फॅमिली कट्टा’ सिनेमातही तिच्या भूमिकेचं कौतुक झालं.

 

 

याशिवाय तिची वैभव तत्ववादी आणि गश्मीर महाजनी यांच्यासोबत कान्हा सिनेमातील केमिस्ट्रीही रंगली.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. . Wearing @vastrabymilonee . . #peace #followyourinstinct #2019 spread love

A post shared by Gauri Nalawade (@gaurinalawadeofficial) on

 

यावर्षी संतोष जुवेकरसोबत ‘अधम’ या सिनेमात दिसली होती. गौरी सोशल मिडियावरही अ‍ॅक्टीव्ह असते.

 

 

वेगवेगळ्या लूकमधले स्टायलिश फोटो ती सोशल मिडियावर शेअर करत असते. तिचे हे लूक तुम्हालाही आवडेल.

Recommended

PeepingMoon Exclusive