अभिनेत्री जेनिलिया देशमुख हिला कोण ओळखत नाही? गोंडस चेह-याची ही अभिनेत्री महाराष्ट्राच्या माऊलीच्या आयुष्यात आली आणि सगळ्यांचीच वहिनी झाली. जेनिलियाने आजवर तेलगु, हिंदी, तमिळ, कन्नड़ व मल्याळम या सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रितेश देशमुखशी लग्नानंतर त्यानंतर संसारात रमलेल्या जेनिलियाने ‘लय भारी’ आणि माऊली या सिनेमांमध्ये डान्स नंबरही केला.
अलीकडेच जेनिलियाने स्पेशल फोटोशूट केलं आहे. एरवी फॅमिली आणि मुलांचे फोटो पोस्ट करणा-या जेनिलियाने अलीकडे तिचे काही स्टायलिश फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. याशिवाय जेनिलिया पुर्वीपेक्षा अधिक फिट स्लीम दिसत आहे. याशिवाय तिचा सोशल अपिअरन्सही वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जेनिलिया स्क्रीनवर दिसू शकते अशी आशा तिच्या फॅन्सनी बाळगायला हरकत नाही.