By  
on  

या मराठी शोच्या मंचावर आली दीपिका पादुकोण

सध्या दोन गोष्टींची जबरदस्त चर्चा सुरु आहे. एक म्हणजे ‘छपाक’ सिनेमा आणि दुसरं म्हणजे या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी दीपिका पादुकोण.

सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळालाय तरीही दीपिका मात्र अजूनही प्रमोशनमध्येच व्यस्त आहे. 


नुकतीच दीपिका या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहोचली एका मराठी सिंगींग रिएलिटी शोच्या मंचावर. हा रिएलिटी शो म्हणजे नुकताच सुरु झालेला 'मी होणार सुपरस्टार' हा शो आहे. 


यावेळी दीपिकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. या साडीत दीपिका अतिशय सुंदर दिसत होती. 


या शोमध्ये गायक मिका सिंह, शान, सुखविंदर सिंह, उदीत नारायण, शाल्मली खोलगडे आणि नकाश अजीज ही संगीत क्षेत्रातील मंडळी आहेत.

शिवाय प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, राहुल देशपांडे आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या शोचे जज आहेत. अभिनेता पुष्कर क्षोत्री या शोचं सुत्रसंचालन करतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive