स्वत:च्या प्रयत्नाने यशाच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. मराठी सिने आणि नाटकसृष्टीत स्वतःच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात करणा-या सिद्धार्थने थेट बॉलिवुडपर्यंत मजल मारली. सिद्धार्थ अलीकडेच ‘धुरळा’ या सिनेमात दिसला होता. सिद्धार्थ सोशल मिडियावर बराच अॅक्टीव्ह असतो. अनेकदा तो त्याचे स्टायलिश फोटो शेअर करत असतो. वेगवेगळ्या लूकमध्ये आणि गॉगल्स घातलेल्या सिद्धार्थच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत असतात. पाहा त्याचे काही खास फोटो....