अभिनेत्री नेहा पेंडसे आगामी ‘जुन’ सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. नेहाने अलीकडेच तिचे काही फोटोज सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. बेज कलरचा क्रॉप टॉप तिने घातला आहे.
आणखी एका फोटोशूटमध्ये तिने बबली लूक शेअर केला आहे.
प्रिंटेड टी शर्ट आणि यलो बेलबॉटम मध्ये नेहा खुपच क्युट दिसत आहे.
नेहा शार्दुल बयाससोबत जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकली. नेहाने यावेळी शार्दुलला ट्रोल करणा-यांना तिने चांगलं उत्तर दिलं होतं.