By  
on  

प्रार्थनाचा हा इंडोवेस्टर्न लुक पाहून नेटक-यांना आली रणवीर सिंहची आठवण

मराठी सिनेसृष्टीतील एक गुणी अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरे हे नाव आग्रहानं घ्यावं लागतं. प्रार्थना लवकरच अभिनेता भूषण प्रधानसोबत अजिंक्य या सिनेमात झऴकतेय. या सिनेमाच्या प्रोमोशननिमित्त दोघंही दौ-यावर आहेत. यानिमित्ताने तिचे अनेक फोटो ती सोशल मिडीयावरुन चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण नुकत्याच साज-या झालेल्या  जागतिक महिला दिनानिमित्त प्रार्थनाने काही फोटो पोस्ट करुन सर्वांना आश्चर्यचकित करुन टाकलं आहे. 

आधी जीन्स ..त्यावर साडी पुन्हा त्यावर जॅकेट, मोठं कुंकू अशा या लुकवर व्हाईट शूज अशा इंडोवेस्टर्न अवतारातला फोटो प्रार्थनाने पोस्ट केला आणि त्यावर सिनेसृष्टीतून व चाहत्यांकडून कॉमेंट्स व लाईक्सचा वर्षाव सुरु झाला आहे. प्रार्थनाच्या लक्षवेधी फोटोंसोबतच तिने एक काहीओळीसुध्दा लिहल्या आहेत. ती म्हणते, "आज थोड़ा लिबास में बदलाव लाया। कल थोड़ा समाज में होगा।पहचान तो है ही मेरी। बस अब रवायत ए आगाज़ होगा।" 

चाहत्यांना प्रार्थनाचा हा लुक आवडला असला तरी काही संमिश्र प्रतिक्रीयासुध्दा पाहायला मिळाल्या. काही म्हणाले फॅशनच्या नावावर काहीही तर काही म्हणाले, अगदी रणवीर सिंहच दिसतेय. 

लग्नानंतर प्रार्थना सिनेमांबाबतीत खुपच सिलेक्टीव्ह झालीय. ती नेहमी कुटुंबाला प्राधान्य देताना पाहायला मिळते. तिचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य इंडस्ट्रीतला मोठा डिस्ट्रीब्युटर आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive