By  
on  

पुजा सावंतचा हा मराठमोळा अंदाज तुम्हाला कसा वाटला?

लोभस चेहरा असलेल्या अभिनेत्री पुजा सावंतचे अनेक फॅन्स आहेत. उत्तम अभिनेत्री, उत्तम नृत्यांगना अशी ओळख असलेली पुजा आजवर अनेक सिनेमांमधून . पुजाने आतापर्यंत नीळकंठ मास्तर, दगडी चाळ, लपाछपी, बोनस अशा सिनेमात अभिनयाची छाप सोडली आहे.

 

 

पुजा सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. सध्या तिचा निळ्या साडीतील लूक व्हायरल होत आहे. गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर पुजा पारंपरिक वेशात सजली आहे. एका सुवर्ण पेढीसाठी केलेल्या या जाहिरातीमध्ये पुजा झुबे, ठुशी, नथ, मंगळसुत्र, तोडे, अंगठी हे दागिने घालून गुढीची पुजा करताना दिसत आहे. 

 

 

पुजा अलीकडेच ‘विजेता’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  या सिनेमात ती ट्रायथलॉन अ‍ॅथलिटची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 12 मार्चला रिलीज झाला होता. पण सिनेमागृहांवर असलेल्या बंदीमुळे हा सिनेमा पुन्हा रिलीज केला जाणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive