झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेचे अनेक फॅन्स आहेत. मालिकेतील कैवल्य, आशू, अॅना, मीनल, रेश्मा, राकेश, निशा या व्यक्तिरेखा प्रत्येकांना आवडल्या. आज मालिका संपली तरी प्रेक्षकांच्या ती चांगलीच स्मरणात आहे. या मालिकेत निशाची व्यक्तिरेखा देखील आठवत असेल. निशाची भूमिका साकारणारी मंजिरी पुपाला सोशल मिडियावर अॅक्टीव्ह असते.
सोशल मिडियावर ती अनेकदा तिचे खास फोटो शेअर करत असते. दिल दोस्ती दुनियादारीनंतर मंजिरी ग्रहण या मालिकेतही दिसली. याशिवय ती हिंदीमधील इश्कबाज या मालिकेतही झळकली होती.