नेहमीपेक्षा वेगळ्या वाटा शोधणारे दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळेंचं नाव घेतलं जातं. फॅण्ड्री, सैराट सारख्या सिनेमातून त्यानी स्वत:ची खास ओळख निर्माण केली. फॅण्ड्री हा सिनेमाही बराच गाजला. फॅण्ड्रीमध्ये सोमनाथ अवघडे मुख्य भूमिकेत होता. पण या सिनेमात एकही संवाद न बोलता भाव खाऊन गेली ती शालू.
शालू म्हणजेच राजेश्वरी खरातचा या सिनेमात एकही संवाद नव्हता. पण तिचा वावर अनेकांना आवडला. फॅण्ड्रीनंतर राजेश्वरी काय करते याची उत्सुकता तिच्या फॅन्सनाही आहे. फॅण्ड्रीनंतर राजेश्वरी आयटमगिरी सिनेमातही दिसली होती. पण त्यानंतर मात्र तिने शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं आहे. सिनेमात साधी असणारी राजेश्वरी प्रत्यक्षात मात्र खुप स्टायलिश आहे. पाहा तिचे हे फोटो.