वैजू नंबर 1 ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. अवखळ आणि मनमिळावू वैजू प्रत्येकालाच आवडते.
एरवी साडीचा लूक कॅरी करणारी वैजू म्हणजेच सोनाली पाटील रिअल लाईफ मध्ये मात्र खास दिसते.
सोनाली पेशाने शिक्षिका आहे. पण अभिनयाच्या ओढीने ती या क्षेत्रात आली.
सोशल मिडियावरील व्हिडियोमुळे तिला या भूमिकेच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आलं होतं.
त्यानंतर तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. आता शुटिंग पुन्हा सुरु होत असल्याने वैजू लवकरच चाहत्यांच्या भेटीला येईल यात शंका नाही.