या लॉकडाऊनमध्ये आपण सगळ्यांनीच घरी जास्तीत जास्त वेळ घालवला आहे. अशा वेळी एरवी स्टायलिश कपड्यात वावरणारा प्रत्येक जण घरच्या पायजम्यात होता.
पण लोभस चेहरा असलेली अभिनेत्री श्रुती मराठेने मात्र फॅन्सना जणू लॉकडाऊन स्टायलिंग गोल्स दिले आहेत.
कधी वनपीस, कधी पलाझो तर कधी शर्ट आणि शॉर्टस या लूकमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे.
आपल्या सुंदर अदाकारीने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान श्रुती मराठेने निर्माण केलं आहे. श्रुती आता आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमात दिसणार आहे.