फोटोतील या गोड अभिनेत्रीला ओळखलं का? अभिनयासोबत गायनातही आहे पारंगत

By  
on  

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवत बहीण गौतमी देशपांडेही अभिनय क्षेत्रात आली आहे. पण आता तिची ओळख केवळ मृण्मयीची बहीण इतकीच न राहता अभिनेत्री गौतमी देशपांडे म्हणून झाली आहे. सध्या तिची माझा होशील ना ही मालिका चांगलीच लोकप्रिय होतेय.

 

विराजस कुलकर्णी या तिच्या लहानपणीच्या मित्रासोबतच पडद्यावर नायिका साकारण्याची संधी मिळाल्याने या दोघांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. सारे तुझ्याचसाठी या मालिकेतून हर्षद अटकरी याच्यासोबत गौतमीने टीव्ही मालिकेत पदार्पण केलं. गौतमीने नुकताच तिच्या लहानपणीचा एक अल्बम शेअर केला आहे. यामध्ये गौतमी भलतीच गोड दिसते आहे. खुप जुनं फोटोशूट हे कॅप्शन देत गौतमीने हे फोटो शेअर केले आहेत.

 

Recommended

Loading...
Share