रकुल प्रीत सिंग आणि दीपिका पदुकोण मुंबईमध्ये दाखल, रकुलची 25 सप्टेंबरला तर दीपिकाची 26 सप्टेंबरला होणार चौकशी

By  
on  

NCB ने बॉलिवूड ड्रग कनेक्शनची पाळंमुळं शोधून काढण्यास सुरुवात केली आहे. NCB आता अभिनेत्रींची चौकशी करत आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि दीपिका पदुकोण चौकशीसाठी मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत. रकुलला 25 सप्टेंबरला चौकशीसाठी NCBमध्ये बोलावलं आहे. 

NCB  आता अभिनेत्री दीपिका पदुकोणची या प्रकरणात चौकशी करणार आहे. दीपिकाला 26 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावलं जाईल. या चौकशीसाठी शुटिंग निमित्त गोव्यात असलेली दीपिका पती रणवीरसह मुंबईमध्ये दाखल झाली आहे. पाहा हे फोटो

 

Recommended

Loading...
Share