पुन्हा रंगणार सुरांची नवी परिभाषा, ‘सुर नवा ध्यास नवा’चं नवीन पर्व

By  
on  

प्रेक्षकांना आपल्या सुरेल स्वरांनी मंत्रमुग्ध करणारा शो म्हणजे ‘सुर नवा ध्यास नवा’. या शोच्या प्रत्येक सीझनने रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. आताही या शोच्या नव्या पर्वाची नांदी झाली आहे. नुकताच या नव्या शोचा प्रोमो समोर आला आहे. ‘सुर नवा ध्यास नवा: आशा उद्याची’ असं या नव्या पर्वाचं नाव आहे. या पर्वाचं स्वरुप कसं असेल, स्पर्धक कोण कोण असतील याबाबत अजून स्पष्टता नाही. तरीही या नव्या प्रोमोने उत्सुकता वाढली आहे.

 

 

 

Recommended

Loading...
Share