‘कोण होणार करोडपतीच्या’ नव्या पर्वात दिसला सचिन खेडेकरांचा खास अंदाज

By  
on  

कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अभिनेता सचिन खेडेकर हे सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करताना प्रेक्षकांना दिसणार आहेत.  विशेष म्हणजे कार्यक्रमाचे पहिले आणि दुस-या पर्वाचे सुत्रसंचालन सचिन यांनीच केले होते. आताचं पर्व ही त्यांच्या सुत्रसंचालनाची हॅटट्रिक असणार आहे.  नुकतंच त्यांना गोरेगाव फिल्म सिटी येथे पाहण्यात आलं, कार्यक्रमाचा सेट देखील फिल्मसिटीमध्येच उभारला असल्याचं म्हटलं जातंय. पाहा, कोण होणार करोडपती 12 जुलैपासून.

Recommended

Loading...
Share