कलर्स मराठीवर पुन्हा एकदा रंगणार सुरांचा संग्राम, या कार्यक्रमाचं तिसरं पर्व रसिकांच्या भेटीला

By  
on  

रिअ‍ॅलिटी शोचा ट्रेंड सर्वत्र जोरात आहे. मराठी वहिन्याही या रेसमध्ये मागे नाहीत. कलर्स मराठीवरही एका रिअ‍ॅलिटी शोच्या तिस-या पर्वाची नांदी झाली आहे. हा शो आहे ‘सुर नवा ध्यास नवा’. या शोच्या मागील दोन्ही पर्वांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हे जाणूनच या शोचं तिसरं पर्व रसिकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे यावेळी वयोगटही काहीसा हटके आहे.

 

या वेळच्या पर्वाचा वयोगट आहे 5 ते 55 वर्षं. यावेळी वाहिनीने रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये अवधुत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळेही दिसत आहेत.  त्यामुळे या पर्वाचे परीक्षक हे तिघेच असणार हे देखील स्पष्ट झालं आहे. दमदार सुरांना मिळणार नवी ओळख, अष्टपैलू परीक्षक करणार सुरेल हिऱ्यांची पारख… असं कॅप्शन हा प्रोमो पोस्ट करताना वाहिनीने दिलं आहे. या पर्वाच्या ऑडिशनालाही लवकरच सुरुवात होणार असल्याचं समजलं आहे.

Recommended

Loading...
Share