‘सुर नवा ध्यास नवा’च्या मंचाला लाभली या मराठी तारकांची झळाळी

By  
on  

कलर्स मराठीवरील ‘सुर नवा ध्यास नवा’ या शोमध्ये दिवसेंदिवस रंगत वाढताना दिसत आहे. यावेळी या कार्यक्रमाची थीम देखील काहीशी हटके आहे. या कार्यक्रमात यावेळी 5 ते 55 वर्षांचा वयोगट सहभागी आहे. त्यामुळे विविध वयोगटातील स्पर्धक उत्साहाने गाणं गाताना दिसतात. आता या मंचावर यावेळी खास पाहुणे हजेरी लावताना दिसत आहेत. 

यावेळी या मंचावर मराठी सिनेमातील 80 ते 90 चं दशक गाजवणा-या वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे, प्रिया बेर्डे या अभिनेत्री या मंचावर दिसणार आहेत. या तिघींमुळे मराठी सिनेमातील विविध आठवणींना उजाळा मिळेल यात शंका नाही. या एपिसोड कधी प्रसारित होईल याची चाहत्यांनाही उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share