वेगळं काही करण्याची मज्जाच वेगळी, ओळखलंत का या अभिनेत्याला?

By  
on  

अभिनेता अंशुमन विचारे आपल्या धम्माल विनोदी अभिनयाने गेली कित्येक रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतोय. अनेक प्रसिध्द कॉमेडी शोज् तो आपल्या दमदार शैलीने गाजवतोय. सोशल मिडीयावर सतत चाहत्यांशी कनेक्ट राहणा-या अंशुमनने नुकताच त्याचा एक धम्माल फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

अंशुमनने एका स्त्रीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून खुद्द तो अंशुमनच आहे. नऊवारी साडी, नथ, गजरा असा मराठमोळा साज केलेला अंशुमन खुप गोड दिसतोय. त्यामुळेच त्याचे चाहते भलतेच खुश झाले आहेत. 

 

हे फोटो शेअर करताना अंशुमन लिहतो,  "वेगळं काही करण्याची मज्जाचं गंमत वेगळी असते."

 

 

अनेक कॉमेडी शोज् आणि सिनेमांमधून छाप पाडणारा अंशुमन विचारे हा सिनेसृृष्टीतला लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.  त्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Recommended

Loading...
Share