By  
on  

Movie Review: ग्रामीण भागातील क्रिडाजीवनाचं विदारक चित्र दाखवणारा 'पळशीची पिटी'

फिल्म- पळशीची पी टी
निर्मिती संस्था - ग्रीन ट्री प्रोडकशन
कथा/निर्माता/दिग्दर्शक-धोंडिबा बाळू कारंडे

कलाकार: किरण ढाणे, राहुल मगदुम, तेजपाल वाघ, राहुल बेलापूरकर
पटकथा- तेजपाल वाघ , महेशकुमार मुंजाळे
संवाद - तेजपाल वाघ 
रेटिंग - 2.5 मून 

देश कितीही प्रगत झाला तरीही अजुनही लोकांची संकुचित मानसिकता काही सुधारलेली नाही. ग्रामीण भागात वावरताना या गोष्टींचा वारंवार प्रत्यय येतो. आजही तेथे मुलींना कमी लेखलं जातं आणि त्यांना दुय्यम वागणुक दिली जाते. खुपवेळेस क्रीडाप्रकारांना दुर्लक्षिलं जाऊन ज्या विद्यार्थ्यांना खरंच स्वतःचं नाव कमवायचं आहे अशा निपुण विद्यार्थ्यांना या उदासिनतेमुळे पुढे येता येत नाही. धोंडीबा बाळु कारंडे दिग्दर्शित 'पळशीची पिटी' हा सिनेमा हेच वास्तववादी चित्रण दाखवतो. 

कथानक:
पळशी गावातील वैराण जमिनीपासुन सिनेमाची सुरुवात होते. या गावात राहणारी भागी(किरण धाणे) शाळेत अनवाणी जाते. तिला धावण्याची विशेष आवड. म्हणुन भागीला पळशीची पिटी उषा असं संबोधलं जातं. अगदी ती शिक्षा म्हणुन छडी खाण्याऐवजी मैदानाला राऊंड मारणं पसतं करते. एके दिवशी शाळेत आंतरशालेय धावण्याच्या स्पर्धेत मुलींनी भाग घेण्यासाठी फतवा येतो. भागी या स्पर्धेत भाग घेऊन या स्पर्धेत पहिली येते. त्यानंतर पुढे तालुकास्तरीय पातळीवर सुद्धा भागी अव्वल ठरते. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने भागी घरच्यांपासुन हे लपवुन ठेवते. बुरसटलेल्या विचारांचे आई-बाबा तिचं विकासशी(राहुल मगदुम) लग्न ठरवतात. त्यानंतर पळशी खेळात पुढे जाते का? की तिच्या आयुष्याची शोकांतिका होते? या प्रश्नांची उत्तरं हा सिनेमा पाहुन कळुन येतील. 

दिग्दर्शन:
धोंडीबा बाळु कारंडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. सिनेमा पाहताना निर्मितीमुल्यांचा अभाव जाणवतो. परंतु दिग्दर्शकाला जे प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचं आहे ते अचुक पोहचतं. ग्रामीण भागातील शाळा व्यवस्थापनाच्या उदासीनतेमुळे इच्छा असुनही विद्यार्थ्यांना पुढे येत नाही. तसेच अजनुही बुरसटलेल्या विचारसरणीची माणसं मुलींचं खच्चीकरण करुन त्यांच्या अंगातलं कौशल्य डावलतात. आदी अनेक गोष्टी दिग्दर्शकाने दाखवल्या आहेत. परंतु हे सर्व दाखवताना सिनेमाचा वेग संथ झाला आहे. काही अनावश्यक प्रसंगांची काटछाट केली असती तर हा सिनेमा आणखी प्रभावी झाला असता. मध्यंतरापुर्वी कथा पुढे सरकत नाही. मध्यंतरानंतर मात्र सिनेमा वेग पकडतो. प्रख्यात बासरीवादक अमर ओक यांच्या बासरीच्या ट्युनचा संगीत म्हणुन चांगला वापर केला आहे. 

अभिनय:
सर्व कलाकार नवखे असले तरी त्यांनी आपापल्या भुमिका उत्तम साकारल्या आहेत. भागीच्या भुमिकेची नस किरण धाणेने उत्तम पकडली आहे. खेळाची आवड असलेली तरी समाजाच्या मानसिकतेमुळे होत असणारी भागीची घुसमट किरण धाणेने प्रभावीपणे साकारली आहे. तसेच भागीला सतत प्रोत्साहन देणा-या बिडकर सरांच्या भुमिकेतले राहुल बेलापुरकर सुद्धा लक्षात राहतात. 

 

सिनेमा का पाहावा?
अशा अनेक मुली असतील ज्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि समाजाचं पाठबळ न मिळाल्याने आपली स्वप्नं धुळीला मिळवावी लागली असतील. अंगात अनेक कौशल्य असुनही त्या कधी पुढे आल्या नसतील. 'पळशीची पिटी' पाहुन याच गोष्टीची जाणीव होते.

Recommended

PeepingMoon Exclusive