Movie Review - घराघरात घडणारी गोष्ट आणि वडिलधा-यांंची किंमत समजावून सांगणारा रंजक सिनेमा

By  
on  

सिनेमा - एबी आणि सिडी
दिग्दर्शक - मिलिंद लेले
लेखक - हेमंत एडलाबादकर
निर्माते - अक्षय बर्दापूरकर 
संगीत - आशिष मुजुमदार आणि मयुरेश पई
कालावधी - २ तास 
रेटिंग - 3 मून

बिग बी अमिताभ बच्चन मराठी सिनेमात कधी झळकणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्यातच 'एबी आणि सिडी' या मराठी सिनेमात बिग बी अमिताभ आहेत म्हटल्यावर ती उत्सुकता आणखी वाढली. याआधी अमिताभ बच्चन मराठी सिनेमात झळकले होते. मात्र या सिनेमात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. फक्त महत्त्वाचीच नाही तर सिनेमालाच त्यांचं नाव आहे. 

 

 

विक्रम गोखले, सायली संजीव, अक्षय टांकसाळे, नीना कुळकर्णी, सागर तळाशीकर, सीमा देशमुख, लोकेश गुप्ते, शर्वरी लोहकरे, साक्षी, जयंत सावरकर हे कलाकार या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत आहेत.  सत्तरी ओलंडलेले आजोबा आणि त्यांना आपल्या आई बाबांकडून मिळणारी वागणूक हे पाहून  नातवंडांना सुचलेली युक्ती, आणि त्यातून पुढे काय काय घडत जातं हे रंजक पद्धतीने दाखवण्यात आलंय.

 विक्रम गोखले यांच्यासारखा दिग्गज अभिनेता या सिनेमाला लाभल्याने जेव्हा जेव्हा स्क्रिन वर ते दिसतात तेव्हा तेव्हा पडद्यावर नजरा खिळवून ठेवणारा त्यांचा अभिनय पाहायला मिळतो. आपण आपल्या वडिलांना, आजोबांना पाहतो असाच जाणवतं.  अक्षय टांकसाळे ने साकारलेला नातू आणि सायली ने साकारलेली त्याची मैत्रीण यांचं कॉम्बिनेशन चांगलं जुळलय. चंद्रकांत देशपांडें ची मुले, सूना, नातवंड, मित्र मंडळी साकारलेले कलाकार भूमिकेत योग्य बसलेत. नीना कुळकर्णी आणि सुबोध भावे सिनेमात पाहुणे कलाकार म्हणून असले तरी त्यांच्या प्रभावी भूमिका पाहायला मिळतात. 

सिनेमाचं पार्श्व संगीत काही महत्वाच्या सीन मध्येही कमकुवत असल्याचं जाणवतं.  मात्र 'असा हात हाथी' हे वैभव जोशीने लिहिलेलं गाणं जे नीना कुळकर्णी आणि विक्रम गोखले यांच्यावर चित्रित केले आहे. या गाण्याचं चित्रण उत्तम झालंय, ज्यात पुन्हा एकदा दोन उत्तम कलाकार स्क्रीनवर एकत्र दिसतात. शास्त्रीय गायिका देवकी पंडीत यांचं एक गाणं या सिनेमाच्या पूर्वार्धात एका अशा वळणावर येतं त्या गाण्यात आपण रमून जाऊ असं ते गाणं आहे. आशिष मुजुमदार आणि मयुरेश पई यांनी या सिनेमाचं संगीत दिलं असून श्रवणीय गाणी या सिनेमाला लाभलीय.
सिनेमातील मुख्य पात्र जे चंद्रकांत देशपांडे जे साकारले आहेत विक्रम गोखले यांनी, त्यांच्या आयुष्यात अचानक असा काही बदल होतो ज्याने त्यांच्या आयुष्यात सगळं बदलतं. हा बदल कोण घडवून आणते , हा बदल कसा होतो हे पाहणं इंटरेस्टिंग वाटतं. 

सिनेमाच्या पूर्वार्धात बिग बी कधी दिसतील याची उत्सुकता ताणत जाते. मात्र उत्तरार्धात बिग बीं ना पाहून, त्यांचा वावर आणि ते सगळंच पाहून हा किती मोठा कलाकार आहे याची पुन्हा जाणीव होते. या सिनेमात अमिताभ हे अमिताभ बच्चन च साकारत आहेत. त्यामुळे जसा त्यांचा खरा आयुष्यात वावर जसा आहे तेच इथेही पाहायला मिळतं. या सिनेमाचा हा भागही तितकाच लक्ष्यवेधी ठरतो. कमी कालावधीतही बिग बींना पाहून समाधान मिळते यासाठी दिग्दर्शक मिलिंद लेले यांचं विशेष कौतुक. अमिताभ यांचा 'चंदू मी आलोय' हा डायलॉग मराठी सिनेमात कमाल करून जातो.

 तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा , आजी आजोबांचा, त्यांच्या वयाचा विसर पडला असेल तर हा सिनेमा पाहिल्या नंतर यात नक्की बदल होईल. बिग बी अमिताभ बच्चन यांना मराठी सिनेमात पहायची इच्छा असेल, आणि एकीकडे बॉलिवूडचा बिग स्टार आणि मराठीतील दिग्गज कलाकार विक्रम गोखले हे स्क्रीनवर जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय कमाल करतात हे अनुभवायचं असेल तर हा सिनेमा नक्की पाहा.

Recommended

Loading...
Share