जोडी तुझी-माझी, सखी-सुव्रतचा हा गोड फोटो पाहा

By  
on  

सध्या लंडनमध्ये आपला लॉकडाऊन व्यतीत करत असलेलं मराठी सिनेसृष्टीतलं हे लाडकं कपल सखी गोखले व सुव्रत जोशी यांचा एक गोड फोटो नुकताच सखीने पोस्ट केला आहे. अगदी मेड फॉर इच अदर असं हे कपल आहे. 

सध्या दोघंही लॉकडाऊनमध्ये आठशे खिडक्या नऊशे दारं या पहिल्या-वहिल्या घरातूनच शूट करण्यात येणा-या मराठी  मालिकेसाठी थेट आपल्या लंडनच्या घरातून शूट करतायत. 

दिल दोस्ती दुनियादारी मधून त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली आणि  दिल दोस्ती दोबारा, अमर फोटो स्टुडिओ हे नाटक यातून ती हळूहळू फुलत गेली. त्यानंतर मग आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याच्या त्यांनी आणाभाका घेतल्या. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg) on

मागच्या वर्षी कर्जतच्या सगुणा बागमध्ये निसर्गाच्या सानिध्यात फक्त जवळचे काही नाते वाईक व सिनेसृष्टीतील मित्रमंडळी यांच्या साक्षीने ते विवाहबंधनात अडकले. त्यांचं लग्न हे सिनेसृष्टीतलं एक चर्चित सोहळा ठरला. 

 

दोघंही अनेकदा सोशल मिडीयावरुन रोमॅंण्टीक फोटो पोस्ट करत असतात आणि चाहतेसुधदा त्या फोटोंवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतात. 

Recommended

Loading...
Share