Video : परदेशवासीय अश्विनी भावेंकडे ब्रेकफास्टला आज आहे वाफाळती इडली आणि सांबार

By  
on  

आपल्या सदाबहार अभिनयाने व सौंदर्याने हिंदी-मराठी सिनेसृष्टीचा 80-90 चा काळ गाजवणा-या अभिनेत्री अश्विनी भावे या आपल्या कुटुंबासह अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांच्या नेहमीच अमेरिका आणि भारत अशा वा-या सुरु असताात. जरी त्या परदेशी राहत असल्या तरी त्यांची नाळ इथल्या संस्कृतीशी अजुनही जोडलेली आहे. 

एव्हरग्रीन अश्विनी भावे या सोशल मिडीयाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात. अमेरीकेतील घडामोडी कळवतात तसंच आपल्या भारतात घडणा-या घटनांवरसुध्दा त्या मोकळेपणाने व्यक्त होतात. आज सकाळीच अश्विनी भावे यांनी एक मस्त रिफ्रेशिंग व्हिडीओ पोस्ट केला आणि सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटलं. 

अश्विनी यांनी आज परदेशातल्या आपल्या घरी ब्रेकफास्टला वाफळत्या इडल्या आणि सांबार - चटणी असा बेत आखला व चाहत्यांनासुध्दा विचारलं तुमचं इडलीसोबतचं कॉम्बिनेशन सांगा. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The all-time favorite breakfast Idli with sambar and chutney What's your best combination with idli?

A post shared by Ashvini Bhave (@ashvinibhave) on

Recommended

Loading...
Share