Video : एक लाजरान..साजरा मुखडा हे प्रसिध्द गाणं म्हणत अश्विनी भावे सांगतात

By  
on  

एव्हरग्रीन अभिनेत्री अश्विनी भावे या परदेशात वास्तव्यास असतात हे आपल्याला माहितच आहे. त्या परदेशात असल्या तरी भारतीय संस्कृतीशी जोडलेली त्यांची नाळ  कायम आहे. अमेरिकेतसुध्दा त्या आपलं मराठीपण दिमाखात जपताना मोठ्या उत्साहात पाहायला मिळतं. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या अश्विनी भावे या सतत परदेशातील अपडेट्स आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवात. 

अश्विनी भावे यांना बागकामाचीसुध्दा प्रचंड आवड असल्याचं अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पाहायला मिळालं आहे. अलिकडेच त्यांनी अमिरेकेतील आपल्या शानदार बंगल्याच्या अंगणात मक्याच्या एक दाणा रुजवला होता. त्या मक्याच्या दाण्याचं रोपात आणि त्यानंतर आता मोठ्या झाडात रुपांतर झालं,  जे त्यांच्याही उंचीही पेक्षा मोठं झाल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर झळकला. एखाद्या लहान मुलाचं पालन-पोषण केल्यावर तो जेव्हा मोठा होतो तेव्हा आई-वडीलांना जितका अवर्णनीय आनंद होतो तितकाच अश्विनी यांना झाला आहे. 

 

 

अश्विनी भावे पर्यावरण रक्षणासाठीही नेहमी पुढाकार घेताना दिसतात.एक लाजरान..साजरा मुखडा हे प्रसिध्द गाणं म्हणत त्या सांगतात एखाद्या सिनेमाचं शुटींग माझ्याही घराच्या बागेत नक्कीच होऊ शकतं. हा व्हिडीओ शेअर करतच झाडे लावा...झाडे जगवा असा गो ग्रीनचा पर्यावरणपूरक संदेशसुध्दा त्यांनी चाहत्यांना दिला आहे. 

Recommended

Loading...
Share