अरुंधतीला पाहून घरच्यांच्या आनंदाला उधाण, पाहा व्हिडियो

By  
on  

‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. अरुंधतीसमोर आता अनिरुद्ध आणि संजनाचं खरं रुप आलं आहे. इतके दिवस घर आणि अनिरुद्ध यांच्यामध्ये गुरफटलेल्या अरुंधतीसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. या धक्क्यातून काही अंशी सावरत असलेल्या अरुंधतीसाठी एक एक क्षण अवघड आहे. तरीही यातून तिने स्वत:ची लढाई स्वत: लढण्याचं ठरवलं आहे. 

 

 

स्वत: मध्ये हरवलेली अरुंधती जेव्हा घरच्यांकडे येते तेव्हा घरच्यांच्या आनंदाला उधाण आलेलं दिसतं. पण असं असलं तरी अरुंधतीने तिचा मार्ग निवडला आहे. तिची लढाई ती एकटी लढणार आहे. यावर घरच्यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं रंजक ठरेल.

Recommended

Loading...
Share