सम्राटला धडा शिकवण्यासाठी अनुश्री आणि सानवी एकत्र येणार

By  
on  

‘हे मन बावरे’ मालिकेत तत्वावादी कुटुंबियांना पुन्हा एकदा संकटाची जाणीव होऊ लागली आहे. सम्राटच्या रुपाने पुन्हा एकदा संकट घोंगावू लागलं आहे. पण या सगळयात मात्र अनुश्री कमालीची सावध आहे. अनुश्रीला सम्राटच्या वागण्याची काही अंशी कल्पना आली आहे. त्यामुळेच तिने त्याच्या विरोधात आणखी पुरावे गोळा करायला सुरु केले आहेत.

 

 

पण या कामी तिला साथ मिळणार आहे ती सानवीची. आपल्या भूतकाळामुळे इतके दिवस घरच्यांच्या रागाला कारणीभूत असलेली सानवी आता सम्राटचं खरं रुप समोर आणण्यासाठी सज्ज झाली आहे. या दोघी आता सम्राटचं खरं रुप समोर आणू शकतील का हे लवकरच कळेल. ही मालिका आता नव्या वेळेत म्हणजेच रात्री 10 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Recommended

Loading...
Share