प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी ‘दख्खनचा राजा जोतिबा सज्ज, पाहा व्हिडियो

By  
on  

‘कोठारे व्हिजन’ उत्तमोत्तम मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘ जय मल्हार’ ‘विठू माऊली’ ‘प्रेम पॉयझन पंगा’ या मालिकांच्या यशानंतर महेश कोठारे आणि कोठारे व्हिजन आता ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका घेऊन येत आहेत.  या मालिकेचं मोशन पोस्टर नुकतंच समोर आलंं आहे. या दरम्यान मालिकेची  प्रसारणाची तारीख आणि वेळही समोर आली आहे.

 

 

23 ऑक्टोबरपासून संध्याकाळी 6.30 ला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच या मालिकेच्या सेटचं भूमिपुजन पार पडलं. 'कोल्हापूर चित्रनगरी' मध्ये सेट उभारणीचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला होता. या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना ज्योतिबाच्या लीलांचं दर्शन होणार आहे.

Recommended

Loading...
Share