आता आवाज घुमणार कारभा-यांचा, पाहा व्हिडियो

By  
on  

लॉकडाऊननंतर नव्या मालिका सुरु होण्याचा जणू काही ट्रेंडच सुरु झाला आहे. अनेक वाहिन्यांनी नवीन मालिकेची घोषणा केली आहे. यामध्ये झी मराठी कशी बरं मागे राहील? झी मराठीनेही एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. ‘कारभारी लयभारी’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यामध्ये एक युवा नेता जोशपुर्ण भाषण करताना दिसतो आहे. याशिवाय स्वत: कारभारी होण्याबाबतही सांगताना दिसतो आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नवी मालिका 'कारभारी लयभारी' लवकरच....#KarbhariLaybhari #zeemarathi

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

 

पाठमो-या दिसणा-या या युवा नेत्याच्या भूमिकेत कोण असेल याबाबत प्रेक्षकांनी तर्क लावायला सुरुवात केली आहे. अनेकांना या नेत्याच्या भूमिकेत निखिल चव्हाण असेल असं वाटत आहे तर अनेकांनी आदिनाथ कोठारेचं नाव घेतलं आहे. आता या मालिकेत नक्की कोण आहे हे लवकरच कळेल अशी आशा करायला हरकत नाही.

Recommended

Loading...
Share