आईसाहेब संजूवर सोपवणार मोठी जबाबदारी, उरणार नाही तिच्या आनंदाला पारावार

By  
on  

कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी  या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. रांगडा रणजीत आणि खोडकर संजीवनी यांच्यातील नातं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अवखळ, निर्मळ असलेली संजीवनी ढाले-पाटलांच्या घरी सून म्हणून आली आहे. पण सासूबाईंच्या कठोर शिस्तीत तिचा निभाव लागणं हे काहीसं कठीणचं होतं.

 

 

आईसाहेबांची करडी नजर, सतत पाळली जाणारी शिस्त, मान,मर्यादा, अदब याची मोकळ्या वातावरणात वाढलेल्या संजूला सवय होण्यासाठी थोडा वेळ गेला. पण आता आईसाहेबांनी संजूवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी आहे घरातील कारभाराची. आईसाहेबांनी संजूच्या हाती किल्ल्यांचा जुडगा दिला आहे.  यासोबत यापुर्वीप्रमाणे सासूबाई अशी नाही तर आईसाहेब अशी हाक मारण्याचा सल्लाही दिला आहे. आईसाहेबांच्या या वागण्याने संजूला मात्र आकाश ठेंगणं झालं आहे.

Recommended

Loading...
Share