By  
on  

आता शनाया होणार राधिका मसालेची सर्वेसर्वा, पाहा Video

माझ्या नव-याची बायको ही छोट्या पडद्यावरची मालिका रसिक प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. कितीही नावं ठेवा, ट्रोल करा पण याचा परिणाम या मालिकेच्या टीआरपीवर अजिबात होताना दिसत नाही. आता या मालिकेत आणखी एक रंजक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 

300 कोटींचा टर्नओव्हर असलेल्या राधिका मसाले कंपनीला एसबी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये मर्ज करण्यासाठी गुरुनाथ आणि माया यांचे सर्वोतोपरी प्रयत्न  आणि डावपेच सुरु आहेत.  मध्यंतरी सौमित्रचं फोटो प्रकरण काढून गुरुनाथ आणि मायाने राधिका आणि टीमला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, पण राधिका व सौमित्रने  तो हाणून पाडला. तसंच राधिका मसाले एसबीमध्ये संलग्न करण्यासाठी राधिकावर बराच दबावही गुरु-मायाने टाकला. त्यानंतर मात्र राधिकाने राधिका मसालेच्या तिस-या वर्धापनदिनाचा कार्यक्रम जल्लोषात पार पाडण्याचं ठरवलं  आणि यात ती करणार असलेल्या मोठ्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष वेधलं. राधिका या वेळी राधिका मसाले एसबीमध्ये संलग्न करणार हीच मोठी घोषणा असणार असं सर्वांना आणि मुख्य म्हणजे गुरुनाथला वाटलं होतं. 

 

 

 

 

 पण सर्वांचे तर्क-वितर्क खोटे ठरवत राधिकाने एक आश्चर्यकारक निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय. राधिका आता राधिका मसालेमधून निवृत्त होणार असून तिने तिची सर्व सूत्रं शनाया सबनीसच्या हाती दिली आहेत. राधिकाच्या ह्या अजब निर्णयाने माया आणि गुरुनाथच्या चेह-यावरचा रंग तर उडालाच आहे. पण आता ह्यावर बाकीचे आणि मुख्य म्हणजे शनाया कशी रिएक्ट होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive