ही लाडकी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?, जाणून घ्या

By  
on  

लॉकडाऊननंतर अनेक नवनव्या मालिकांचे प्रोमोज विविध वाहिन्यांवर झळकू लागल्याचं आपण सर्वत्र पाहतोय. एकापेक्षा एक विविध कल्पक स्टोरी प्लॉटवर या मालिका आधारित असून लवकरच त्या  रसिकांच्या भेटीला येत आहेत. आता यात आणखी एका मालिकेच्या प्रोमोंनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे ती म्हणजे झी मराठी वाहिनीवरची ‘कारभारी लय भारी’.  

‘कारभारी लय भारी’ या नव्या मालिकेच्या प्रोमोंनी सध्या प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. लागीरं झालं जी मालिकेतला विकी म्हणजेच अभिनेता निखील चव्हाण यात प्रमुख भूमिका साकारतोय. 
 राजकारणाची पार्श्वभूमी असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतेय, नुकतंच या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख आणि वेळ उलगडण्यात आली आहे. पण ही मालिका सुरु झाल्यानंतर कुठली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते.

 

 

पण  ‘कारभारी लय भारी’ ही मालिका येत्या 2 नोव्हेंबरपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होणार आहे. त्यामुळे साहजिकच राणा दा आणि अंजलीबाईंच्या केमिस्ट्रीने रंगलेली सर्वांची लाडकी मालिका तुझ्यात जीव रंगला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचा अंदाज बांधता येतोय. 


 

Recommended

Loading...
Share