'सिंगिंग स्टार'मध्ये रंगणार दादा कोंडके विशेष भाग, पाहा Video

By  
on  

एखाद्याला हसवणं हे महाकठीण काम आहे आणि ते दादा कोंडके या अवलियाला अगदी लीलया जमलं. म्हणूनच 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर या आठवड्यात दादा कोंडके विशेष भाग सादर होणार आहे. या भागात दादा कोंडकेंवर चित्रित झालेली गाणी स्पर्धक सादर करणार आहेत. आस्ताद-सावनी 'गंगू तारुण्य तुझं बेफाम' अशी तुफान गाणी सादर करणार आहेत.

 

 

'सिंगिंग स्टार'चा हा आठवडा असणार आहे मनोरंजनाने भरपूर आणि हास्याने भरलेला, कारण सर्वांच्या लाडक्या हास्यजत्रेच्या नम्रता, प्रसाद, समीर आणि पॅडी यांचीही या विशेष भागात हजेरी असणार आहे. पाहायला विसरू नका 'सिंगिंग स्टार' १६-१७ ऑक्टोबरला रात्री ९ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

 

Recommended

Loading...
Share