By  
on  

परीक्षकांनी दिलेल्या कसोटीवर खरे उतरतील का 'सिंगिंग स्टार'चे स्पर्धक?

'सिंगिंग स्टार' म्हणजे छोट्या पडद्यावर रंगणारी सूरांची बहारदार मैफील. प्रत्येक आठवड्याला सेलिब्रिटी स्पर्धक आपल्या गाण्यातून रसिक प्रेक्षक आणि परिक्षकांची मनं जिंकतात. 'सिंगिंग स्टार'च्या मंचावर या आठवड्यात  सादर होणार परीक्षकांनी स्पर्धकांसाठी निवडलेली गाणी म्हणजेच हा आठवडा असणार आहे चॅलेंज स्पेशल. या भागात तुमचे लाडके स्पर्धक सर्वोत्तम गाणी सादर करणार आहेत.

आस्ताद कधी तू आणि परवर दिगार अशी वेगळ्या धाटणीची गाणी सादर करणार आहे तर स्वानंदी माझिया प्रियाला हे लोकसंगीत आणि केव्हा तरी पहाटे ही गाणी सादर करणार आहे. अजय पुरकर परी म्हणू की अप्सरा हे सदाबहार गाणं गाणार आहे तर यशोमान हाउस ऑफ बोंबे सादर करणार आहे. 

तेव्हा ही सुरांची मैफील म्हणजेच  पाहायला विसरू नका 'सिंगिंग स्टार' ३० आणि ३१ ऑक्टोबरा रात्री ९ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Recommended

PeepingMoon Exclusive