By  
on  

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिका बंद करण्याची पूजारी -ग्रामस्थांकडून मागणी

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही नवी पौराणिक मालिका नुकतीच रसिकांच्या भेटीला आली आहे. अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनने या  मालिकेची  निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे ज्योतिबा देवस्थान असलेल्या कोल्हापूर नगरीतच मालिकेचं संपूर्ण शूटिंग होणार आहे. कोल्हापूर चित्रनगरीत या मालिकेचा भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील तंत्रज्ञ आणि कामगारांना नवी संधी मिळाली आहे. पण ह्या मालिकेचे काही भाग आता प्रसारित झाल्यानंतर ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थ आणि पुजा-यांनी या मालिकेवर आक्षेप घेतल्याने ही मालिका आता वादाच्या भोव-यात सापडली आहे. 

 

सत्यकथा दाखवा अन्यथा मालिका बंद करा अशा घोषणा देत या ग्रामस्थांनी ज्योतिबा मंदिरासमोर निदर्शने केली. तसंच सरंपचांकडे या मालिकेविरोधात एक निवेदनही दिलं. 

सुरुवातीला ही मालिका सुरु झाल्यावर इथल्या ग्रामस्थ व पुजा-यांना खुप आनंद झाला होता. सर्वांनाच आता ज्योतिबाची महती कळेल असे त्यांना वाटले होते. परंतु प्रत्यक्ष मालिका सुरु झाल्यानंतर मात्र त्यांचा भ्रमनिरास झाल्याचे कळते. 

 

बालकलाकार  समर्थ पाटील ज्योतिबाचं बालरुप साकारतोय. समर्थ मुळचा कोल्हापुरातील सरवडे गावचा. ज्योतिबा हे त्याचं कुलदैवत. त्यामुळे लहानपणापासूनच ज्योतिबावर त्याची श्रद्धा आहे. तर तरुणपणीचे ज्योतिबा अभिनेता विशाल निकम साकारतोय. विशालने ह्या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive